==* तुला काय सांगू *==

Started by SHASHIKANT SHANDILE, April 07, 2016, 01:53:42 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

तुला काय सांगू व्यथा या मनाची
तुला काय सांगू मी माझाच नाही
तुला काय सांगू

मला जान आहे चुकतो जरासा
तुझे भान जागी मी बेभान वारा
किती ते करू मी जगने हे सोपे
हरवलो कसे गं मी हे भान सारे

तुझ्या संगतीने जगतो सुखाचा
की वाटेत माझ्या कोणीच नाही
तुला काय सांगू .......

चुकलो जरी ही माझा दोष नाही
दिल्या वेदना या वेळेनेच काही
छड़तो दिवस हा रात्र ही छडते
जीवनाची गाडी विचारांनी सजते

दिली चालना तू जगण्याची आता
की तुझविन मला हे जगायाचे नाही
तुला काय सांगू ........

करतो प्रयत्न मी स्वप्न बघावे
स्वप्नांना माझ्या ही पंख फुटावे
जरा वेळ दे तू सावरतो स्वतःला
मी परतुनी येतो चुकलेल्या वाटा

अंधारात मजला तू सोडू नको गं
की माझेच काही मला भान नाही
तुला काय सांगू व्यथा या मनाची
तुला काय सांगू मी माझाच नाही

तुला काय सांगू व्यथा या मनाची
तुला काय सांगू मी माझाच नाही
--------------//**--
शब्द :- ✍ शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र. ९९७५९९५४५०
दि.०७/०४/२०१६
Its Just My Word's

शब्द माझे!