एक दिवस...!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 07, 2016, 02:24:40 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

एक दिवस...!

तु मला आठवणार नाही एक दिवस
तु मला विसरून जाशील एक दिवस
हा मोगरा फुलांचा देतो गंध आज जरी
कोमेजेल आणि त्याचा गंधही एक दिवस
आज वाटती शपथा तुझ्या ख-या जरी
नियतीही बदलेल खचित एक दिवस
रेखीलेस तु चित्र माझे तुझ्या ह्रदयी जरी
पुसुन जाईल तेही तुझ्या ह्रदयातुन एक दिवस
तु जशी आज आहे ना राहशील ऊद्या जरी
बदलतील ऋतु जसजसे बदशिल तु ही एक दिवस

प्रकाश साळवी