उत्सव एकशे पंचवीस

Started by sanjay limbaji bansode, April 07, 2016, 07:56:35 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

धरणी नटली विहार सजली 
उगवला सोनियाचा हा दिसं 
आहे भीमाचा ..........
माझ्या बाबाचा वाढदिवसं 
उत्सव एकशे पंचवीसं !!

सजवू घर अंगण,करू भीमा वंदन
लावू निळा मस्तकीं,नको टीळा चंदन !
गाऊ या नित्य भीमाचे गीते 
परिधान करू निळा वेष 
माझ्या बाबाचा वाढदिवसं 
उत्सव  एकशे पंचवीसं !!

सोडून काम धंदा,तो आला भीमाचा बंदा 
करी भीमाचा जयजयकार, त्याच्या हातात निळा झेंडा !
आनंदात न्हाला जय भीम म्हणाला 
घेऊन भीमक्रांतीचा ध्यासं 
माझ्या बाबाचा वाढदिवसं 
उत्सव  एकशे पंचवीसं !!

प्रेम अन् शांतीचा,हा उत्सव जयंतीचा 
देई आम्हांस पुन्हां पुन्हां,संदेश भीम क्रांतीचा 
उधळू निळा रंग संजया संग 
या भीम जयंतीत खासं 
माझ्या बाबाचा वाढदिवसं 
उत्सव एकशे पंचवीसं !!

भीमकवी संजय बनसोडे 
9819444028