गुढीपाडवा

Started by sneha31, April 08, 2016, 12:34:31 PM

Previous topic - Next topic

sneha31

आल आल गुढीचं नव वषाच सण
पहाट झाली उठा सगळेझण
चला गुढी उभारुया
स्वागत नव वषाचे करुया

घेऊनी उंच काठी
चढवली साखरेची गाठी
कठीला लावुनी तांब्याचा गडु
विसरुनी जाऊ जुन कडु

गुढीला नेसुनी रेशमी साळी
नैवेद्यात करुनी पुरणपोळी
कडुनींबाची डहाळी,आंब्याची पाने
करुया पुजा स्वच्छ मनाने

तोरणे लावुनी दारी
जीवनात रंगत येवो न्यारी
स्वागत करुनी श्रीरामाचे
नव वष जावो सु:ख,समृद्धी आणी आनंदाचे.

स्नेहा माटुरकर
नागपुर