जीवनप्रवास..!

Started by Rajesh khakre, April 08, 2016, 10:54:05 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

ही होडी जीवनाची
कोणत्या किनारी जाणार
भेटेल कधी किनारा
की अधांतरीच राहणार

हा प्रश्न मनाला
रोज रोज पडतो
उत्तराच्या शोधानेच
जीव भंडावून जातो

अनोळखी दिशा
अथांग हा सागर
जीवनाचा प्रवास
चालू निरंतर
  ©राजेश खाकरे
Mo.7875438494