स्वप्न तुझं आणि माझं

Started by kalpesh.patil, April 09, 2016, 12:46:05 PM

Previous topic - Next topic

kalpesh.patil

😊  स्वप्न तुझं आणि माझं  😊

स्वप्नात येण्याआधी
जरा विचार कर
उगाचच जागा झालो
तर रडशील रात्रभर

स्वप्नात येताना
जरा भान ठेव
जर जागा झालोच
तर ह्रुदय तुझ गहाण ठेव
प्रेमाच्या वाटेवर सांभाळेन त्याला आयुष्यभर
         उगाचच जागा झालो....

स्वप्नात भेटल्यावर
बोलू रात्रभर
रिकामा करुन टाकू
भावनांचा डोंगर
वीरहाच्या दुखाने उफाळून येईल भेटीचा सागर
        उगाचच जागा झालो.....

प्रेमाचे ते तीन शब्द
बोलायला एवढा उशीर का
समोर जमत नाही
म्हणून स्वप्नात येतेस का
पुढच्या भेटिलाच मन तुझं मोकळं कर
        उगाचच जागा झालो.....

                   कल्पेश पाटील
                     9594764745