अरे दुष्काळ दुष्काळ

Started by shrikant dhote, April 10, 2016, 02:52:31 PM

Previous topic - Next topic

shrikant dhote

अरे दुष्काळ दुष्काळ,
आली ही भयाण वेळ,
नाही होत इलाज काही,
नुसतं चर्चेच गुर्हाळ......

असे दुष्काळ दुष्काळ,
जसा सोकावला काळ,
नाही पियायला पाणी,
कसं लावाव ठिगळ.....

अरे दुष्काळ दुष्काळ,
आता सोसवेना कळ,
जिवाची लाही लाही,
मिळेल कैसे जगण्याचे बळ.....

अरे दुष्काळ दुष्काळ,
नाही गुरा चारापाणी,
पाण्यासाठी वणवण,
माय फिरे अनवाणी.......

अरे दुष्काळ दुष्काळ,
झाला चोरांना सुकाळ,
साधतील डाव अपुला,
होईल चारा पाण्याचा घोळ......

अरे दुष्काळ दुष्काळ,
कुणा जगण्याची लढाई,
कुणी जाळ मांडुन आहे,
लाटण्यास रे मलाई,.....

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
१०/०४/२०१६
७८७५०३१८५२
shri