दुःखी बाळ

Started by Minakshi Pawar, April 11, 2016, 06:43:05 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

                   दुःखी बाळ

आई कुणा म्हणू मी
तुजविण कोणी नाही
तुझ्या जाण्याने ग आई
जगणे असह्य होई
मी बाळ तुझा छकुला
प्रेमाचा तुझ्या भुकेला
तु नसता मला कोण
आहे माझे मरण
तु सोडू नको मजला
जीव व्याकुळ जाहला
अंगावरी शहारे
नयनाश्रु तुज निहारे
तुज कुठं पाहू ग आई
देवाघरी का जाई
तुझ्या आखेरच्या ग क्षणी मला घेई कवटाळुणी
जीव माझा तळमळेल
मी भेटाया येईल
देव राहतो आकाशी
आई कुणा म्हणू मी............


               सौ. मिनाक्षी मोहनराव पवार
                   ९५५२६५९०११
                     अमरावती

Meenakshi Mali

आई
तुझी आठवण विसरू
म्हणता विसरेना
डोळयातली आसवं
थांबता  थांबेना
का सोडलेस अर्ध्या वाटेवर हात माझे
बघ आता कसे हाल माझे
मायेनं गं कुणीच जवळ घेइना
कोंडतोय श्वास माझा
आता ही घुसमट सहावेना
रात्र न दिवस न मला कळतोय
आता घेऊन जा
ऐकतेस ना गं हाक आई माझी
किती दूर गेलीस  गं ?
तुझ्यापर्यंत पोहचण्याची
दारंही बंद केलीस माझी
मला आपलं म्हणून जगवणारं आता कुणी नाही
कुणासाठी जगायचं गं मी ? सांग ना गं?
ऐकतेस ना काळजाची हाक माझ्या
असं नाही निदान स्वप्नात तरी
येऊन बोल ना गं  ....



Meenakshi mali
9503878003
[/ :(size]

Meenakshi Mali

गुन्हा काय मी केला ?

प्रेम केले गुन्हा मी काय केला ?
तुझ्यासवे आयुष्य काढायचे
स्वप्न मी पाहीले
गुन्हा मी काय केला ?
तुझ्या साठी घरदार सोडले
इवलंस पिलू जीवापाड जपत
दहा वर्ष काढली तुझ्या विना
गुन्हा मी काय केला ?
रात्र रात्र जागून काढल्या
विरहात तुझ्या
सांग गुन्हा मी काय केला ?
समाजाची टोमणी ऐकत
दिवस काढले
मन मारत हाल अपेष्टा सहन करत जगले
गुन्हा मी काय केला ?...



Meenakshi Mali
9503878003

Meenakshi Mali

 Sorry mi tumala n vichartach
Mazi kavita post keli yethe
Pn Aai mnl ki mi jra khup hlvi hotel mla rhavl nahi
Kavita chany tumchi




Meenakshi Mali