झळा

Started by Dnyaneshwar Musale, April 11, 2016, 10:20:46 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

झिरपला माठ
कोरडीच माती
नाही कुठे पाणी
हंबरडा जनावरे फोडती.

ताट ताट वेचता
हाती धसकाट येती
भरलेली दावणी
मान टाकुन झोपती.

पाडवा घेऊन
आला चैत्र मास
असे कोरडचं रान
पालवीचा एक भास.

भकास रान मोकळ्याचं वाटा
ना मिळे सावली ,फक्त उन्हाच्याच लाटा
सुसाट्याच वादळ कोरडीच हवा
रिकामीच घरटी ना कुठे पाखरांचा थवा.

तहानलय समदं माळरान
आता गरजु दे आभाळ
दाणा दाणा वेचु दे
नको रे मला दुष्काळ.