प्रेम म्हणजे

Started by Vikas Vilas Deo, April 13, 2016, 11:02:12 AM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

प्रेम म्हणजे कोकिलेचे मंजुळ वाणी,
निश्चल निर्मल तहान भागवणारे पाणी......

प्रेम म्हणजे अमृतमधील माधुर्य,
सौज्ज्वल, सालस युवतीचे सौंदर्य ....

प्रेम म्हणजे  चांदण्यांचा शीतल, शांत प्रकाश,
सुगंधी फुलांचा मंद दरवळणारा सुवास......

प्रेम म्हणजे देवासमोर लावलेला दिवा,
मनाला गारवा देणारी मंद वाहणारी हवा......

प्रेम म्हणजे ईश्वराची केलेली आराधना,
धेय प्राप्तीसाठी केलेली साधना.....

प्रेम म्हणजे सकाळचे सोनेरी कोवळे किरण,
इतरांच्या जगण्यासाठी स्वीकारलेले मरण....

प्रेम म्हणजे जीवन जगण्याची आस,
उद्याच्या जीवनाचा लागलेल्या ध्यास....

प्रेम म्हणजे अंधारात तळपणारा तारा,
डोळ्यातून वाहणार्‍या अश्रुंच्या धारा....

प्रेम म्हणजे जगण्यासाठीचा आधार.
सर्व संसार सुखाचे सार...

प्रेम म्हणजे गवताचे नाजुक पातं,
हृदयाला हृदयाशी जोडणार विश्वासाच नातं....

प्रेम म्हणजे जीवनासाठीचा श्वास,
माझा तुझ्यासोबतचा सहवास......

प्रेम म्हणजे खडकाळ माळावर फुललेले फूल,
परमेश्वराला पडलेली सुंदर भूल.....

प्रेम म्हणजे हृदयाला हृदयाशी जोडणारा सेतू,
प्रेम म्हणजे मी अन् तू.......

Kanha

 :)khup chhan ahe tumchi kavita mala ek song aathavla hi kavita vachtana "Main kahin kavi na ban jau tera pyar mein a kavita"