मला आता असे...!!!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 13, 2016, 03:51:24 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

मला आता असे ....!!!
मला आता असे आपले कुणीच नाही राहीले
जरी तयांच्या साठी आयुष्य सारे वाहीले
मोजीत होतो पाढे आपल्या प्राक्तनाचे
गोडवे तरीही माझे कधी कुणी ना गाईले
तु अशी येऊन सहज एकदा भेटून जा
दिस झाले कितीतरी नाही तुजला पाहिले
का ठेऊ आस कुणाची ते काय बांधील माझे?
नसे मजला कुणीही ! विश्व मजसाठी राहीले

✍प्रकाश साळवी✿❀☀