तुझं वागणं

Started by Dnyaneshwar Musale, April 13, 2016, 07:42:33 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तुझं रहदारीच्या रस्त्याच्या कडेला
उठुन दिसणाऱ्या तुझ्या
केसातल्या गजऱ्यातली
फुलं मोजत बसणं,
पण मला बघताच अचानक हसणं.

वही रिकामीच असताना शेवटच्या
पानावर कसल्या तरी
रेघोट्या ओढणं,
आणि अलगद तुझं नाव खोडुन
माझं नाव काढणं.

एक छानशी कळी
उमलत असताना
तुझं तिला तोडणं,
सारं हसतं खेळत असतानाही
मला घट्ट पकडुन तुझं  रडणं.

मी बोलत असताना
माझ्या अधुऱ्या वाक्याला
तुझ्या शब्दांनी जोडणं,
पण सायंकाळी मला बोलावुन
बागेत एकट्यालाच सोडणं.

हे नको ते नको करून
माझ्याशी रागारागाने भांडणं,
पण माझा  मुड खराब असताना
तुझं प्रेमाने वागणं.

खरं तर 
तुझ्या डोक्यात काय चाललंय
मला काही उमजत नाही,
पण प्रत्येक क्षण मला तुझीच
आठवण देऊन जाई.

kamlesh bharmal

@kamlesh