भिमा तु

Started by shrikant dhote, April 14, 2016, 07:16:27 PM

Previous topic - Next topic

shrikant dhote

भिमा!
पेरलीस कातळावर,
परिवर्तनाची बिजे,
श्रमच तुझे एवढे,
तुझ्या घामाने तिथेही ते रूजे .......

आयुष्य वाहिले तु,
उभा करण्या तो वृक्ष,
किती घेतलेस कष्ट,
अवघ जग आहे साक्ष .....

जगविला तो वृक्ष,
काया तु वाहिली,
आम्ही त्याची फक्त,
उपभोगतो सावली ......

चाखतोय आम्ही,
तुझ्या कर्तुत्वाची फळे,
तुझ्या त्यागानेच इथे,
उभे परिवर्तनाचे मळे ......

तु लावलेल्या वृक्षाची आम्ही,
भोगतोय सावली,
तु बहुजनांचा तारणहार,
तुच त्यांची माऊली .......

!!"""श्रीकांत धोटे """!!
टाकळी चनाजी
shri

mohanish khunte


Rupendra N. Ahire