लागेल ठेच ...येईल कळ

Started by radhe92, April 15, 2016, 12:02:09 AM

Previous topic - Next topic

radhe92

लागेल ठेच
येईल कळ ,
अहो सरकार ,
जाणवतेय का तुम्हालाही
दुष्काळाची झळ ......

शेतकऱ्याच्या पाठी ,उन्हाचे वळ
भेगाळल्यात जमिनी,
मध्यमवर्गाचे  पडले कोरडे नळ
नेत्यांच्या जमिनी भिजतात
जशी पाणी शोसते गव्हाची खळ ......

दुष्काळात होते
पाण्यासाठी इकडे -तिकडे पळा -पळ
कारखाने सोडतात मान उंचावून
नद्यांमध्ये मळ  ......

अहो सरकार ,
भाजतेय का तुम्हालाही
दुष्काळाची झळ
दिसतात का तुम्हाला
कुणब्यांच्या छातीवरचे
रक्ताळलेले वळ  ......

ट्न्करने पाणी पुरवता पुरवता
तुम्ही किती कमावता
किती कराल साठा,
विसरलात का रामशेतुत होता
खारीचा ही वाटा  ......

लागेल ठेच ,येईल कळ ,
अहो सरकार , जाणवतेय का तुम्हालाही
दुष्काळाची झळ ......

येतोय का ऐकू ,गरीबांचा टाहू
देव माणसात ,रतीब मात्र मंदिराला
देवून बघा चार दाने ,
त्या राऊळा बाहेरील भुकेल्या जीवाला ......
-संदीप बैलकर