प्रेम झाले असावे...

Started by गणेश म. तायडे, April 15, 2016, 09:57:06 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

काय माहीती मला पण प्रेम झाले असावे...
उठता बसता मुखी तुझेच नाव असावे
तुझ्या येण्याने मन माझे बहरूण यावे
तुझ्या जाण्याने प्राण कासावीस व्हावे
प्रत्येक चेहऱ्यात, तुझ्याच चेहऱ्याला शोधावे
काय माहीती मला पण प्रेम झाले असावे...
हळव्या माझ्या हृदयात सदा तुलाच जपावे
आसवांना तुझ्या, स्मित हसण्यात विणावे
तुझ्या विनोदांवर लोटपोट होऊन हसावे
रूसवे फुगवे तुझे एका क्षणात संपवावे
काय माहीती मला पण प्रेम झाले असावे...
दुःखाला तुझ्या स्वतःचे दुःख अनुभवावे
सुखात तुझ्यासह सारे विसरून जगावे
भिरभिरत्या डोळ्यांत पार बुडून जावे
तुझ्या ओल्या केसात चिंब भिजून निघावे
काय माहीती मला पण प्रेम झाले असावे...

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com