कविता

Started by गणेश म. तायडे, April 15, 2016, 07:51:53 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

कविता असावी सहज
साऱ्यांना कळावी
मनाला भिडणारी
भावना मांडणारी
तिव्रता तितकीच
हृदयाला छेडणारी
मनाला जपणारी
चुकीचं घडल्यास
निषेध करणारी
प्रेमात वाहणारी
शब्दांत रमणारी
दुखात हसवणारी
सुखात जगणारी
कवीमनात जन्मणारी
लेखणीतून निघावी
मनावर उमटावी
कविता असावी सहज
सर्वसामान्यास कळणारी

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com