इथे रीत अशीच असते

Started by Rugwed Sukhatme, April 15, 2016, 11:20:56 PM

Previous topic - Next topic

Rugwed Sukhatme

इथे रीत अशीच असते-

माणुसकीच आमिष दाखवून
माणूस खोटेपणा विकतो
मदतीचा हाथ पुढे करून
धोकेपाणाचा वार करतो!

बेफिकीर स्वभावला
उचलून धरले जाते,
हुशार गाढवाला
खरच गाढव बनवले जाते!

इथे रीत अशीच असते
म्हणून तर जग फसते
मदतीच्या नावाखाली
सगळे खोटे वसते

स्वप्न पाहताना माणूस
हावरट बनून जातो
मूळ इच्चेला मात्र
मनाच्या तळाशी रचतो

हवस असते म्हणून
माणूस मुडदे सुद्धा बसवतो
देवाच्या काळ्या कारखान्यात
आपल्या नावाचा विस्तव पेटवतो

इथे रीत अशीच असते
म्हणूनच जग चालते
माणुसकीच्या नावाखाली
सगळे खोटे वसते!

-ऋग्वेद सुखात्मे