चारोळ्या-बिरोल्या~19

Started by Rajesh khakre, April 16, 2016, 09:59:13 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

आठवण..!

चांगल्या-वाईट क्षणांच्या
आठवणी बनत जातात
जीवनाच्या भूतकाळाचे
वस्र विणत जातात

आठवण कशीही असली
स्मरताना गोडच वाटते
गालावर थोडे हसू आणि
अश्रु डोळ्यांत दाटते

कशा असतात ना आठवणी
जसे मोरपीस पुस्तकातले
जपून ठेवलेल्या भावना
सुखद क्षण हृदयातले

आठवणीच्या गुहेत
कधी गुपचुप शिरावे
ते क्षण पुन्हा पुन्हा
मनसोक्त जगावे

विरुन जातात क्षण
आठवण फक्त उरते
ती मात्र माणसाला
आयुष्यभर पुरते
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com