==* बापाचं रक्त *== (बापाच्या जीवाची आग, त्याचं रक्त पाणी)

Started by SHASHIKANT SHANDILE, April 16, 2016, 12:41:09 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

जाणीव आज झाली स्वप्नांच्या वास्तवाची
चिंगारी आग झाली विझलेल्या विस्तवाची

उगाच बांधिले मी स्वप्नांचे हे मनोरे
तुटायचेच होते आपुलकीचे घरटे
प्रेमाच्या पावसाने सिंचन मी ही केले
वेळेवर ते निघाले अंकुर सारे परके

गुंतलो मी होतो माझ्याच त्या विचारी
लुटवून जाहलो मी श्रीमंतचा भिकारी
चिड़तो राग येतो माझाच आता मजला
जोडले मी हे नाते खोटेच का कुनाशी

विश्वास ही रुसला रक्ताचा आता माझ्या
अनं मीच माझी केली तिरडीची तयारी
कुणाच्या खांद्याचा मी करू आता भरोसा
माझाच रक्त आता माझ्यात बाकी नाही

जाणीव आज झाली रुसलेल्या आसवांची
तिरडी ही निघाली जपलेल्या भावनांची
-------------------//**--
✍ शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!