आयुष्य. ..

Started by Prem Mandale, April 16, 2016, 06:55:36 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

आयुष्यात दोन मिनट कोणी
माझ्या जवळ बसले नाही...
.
आज सगळेच माझ्याजवळ
बसत आहे...
.
काही गिफ्ट नाही मिळाल
आज पर्यंत.,
पण आज फूलच फुल देत आहे..
.
तरसत होतो कुठल्या एका
हातासाठी..,
पण आज खांदेच खांदे देत आहे...
.
दोन पावले सोबत चालायला
कुणी तैयार नव्हत..,
पण आज पुर्ण घोळका सोबत
चालत आहे...
.
आज समजल मला मरण
किती सुंदर असत..,
साला मी उगाचच आयुष्य
जगत राहीलो होतो...
.
स्वलिखीत :: Prem Mandale

Akshay Aiwale

कवीमन

नकोय मला अनोळखींची कटकट
नकोय मला कुणाचीही वटवट
हवीये मला माझी स्वप्नपरी नटखट

नकोयत मला रूक्ष नातेसंबंध
नकोयत मला अवघड प्रेमबंध
हवाय मला सुंदर मैत्रीचा गंध

नकोय मला चित्ताचं अशांतपण
नकोय मला निसर्गाचं भयाणपण
हवंय मला जगण्यातील स्पर्धाशुन्य निरागसपण

नकोय मला गर्दी मानवरांची
नकोय मला वर्दी भ्रष्टाचाराची
हवीये मला सर्दी भावनांची

नकोय मला हे माणसाळलेलं निर्मनुष्य जग
नकोय मला हे भंजाळलेलं अमानवी युग
हवीये मला फक्त स्वप्नाळलेली एकांत आग...

स्वलिखीत :- Akshay Aiwale