तु आहेस इथेच...

Started by Nilkumbhar444, April 19, 2016, 12:39:59 AM

Previous topic - Next topic

Nilkumbhar444

आज तु नाहीस हेच खरं वाटत नाही...
तु आहेस इथेच...
या तप्त श्वासांमधे
या थंड शरीरामधे
या पाणावलेल्या डोळयांमधे.....

या हवेत तु आहेस
या उन्हात तु आहेस
या सुन्या सुन्यात पण आहेस

साऱ्या जुन्यात तु आहेस
सगळ्या नवीन मधे तु आहेस
तु त्या गर्दीतपण आहेस
आणि माझ्या भोवतलच्या एकांतातपण आहेस..

आहेसच तु या पोर्णिमेच्या चंद्रात...
या रात्रिच्या अंधारात...
डोक्याच्या विचारांत...
विचारांच्या भवंडरात...
हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात...
वाऱ्याच्या प्रत्येक झोक्यात...
प्रत्येक पावसात...
पावसाच्या एका एका सरीमधे...
आहेस तु त्या सुरांमधे ...
या शब्दांमधे...
अगदी या कवितेमधे सुद्धा.....


तु अगदी सगळीकडे आहेस...

नाहीस फक्त इथे माझ्यासमोर...
नाहीस फक्त इथे माझ्यासमोर...

- निलेश