बायको मिळाली, थोडीशी सायको मिळाली.

Started by Vikas Vilas Deo, April 19, 2016, 07:55:13 AM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

बायको मिळाली,
थोडीशी सायको मिळाली.
पण नशिबाने बायको मिळाली.

थोडीशी नकटी,
थोडीशी चपटी,
चालण्यात लकटी,
बोलण्यात कपटी.
थोडीशी बडबडी
थोडीशी कटकटी मिळाली.
    ....... बायको मिळाली,
         थोडीशी सायको मिळाली.

डोळ्याने थोडीशी कानी,
ऐकू कमी येई कानी.
थोडीशी वाकड मानी,
समझे स्वत:ला इंग्लंडची राणी.
थोडीशी वेडी,
थोडीशी शहाणी मिळाली.
    ....... बायको मिळाली,
         थोडीशी सायको मिळाली.

चालतांना खाते हेल,
बोलायला जणू हावडा मेल.
भांडायला लागल्यावर क्रीस गेल,
भडकल्यावर रॉकेल तेल.
अडाणी, गावंढळ, चौथी फेल मिळाली.
    ....... बायको मिळाली,
         थोडीशी सायको मिळाली.

आजच्या जमान्यात
जेथे मुलींना गर्भाशयातच मारलाजते.
मुलींना हे जग
पाहू नाही दिलं जाताय.
तेथे कशी का असेना
एकुलत्या एकात बायको मिळाली,
हीच मोठी किमया झाली.
    ....... बायको मिळाली,
         थोडीशी सायको मिळाली.


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]