जन्मठेप

Started by meenakshi mali, April 20, 2016, 12:03:53 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

मला सोडून जाण्याइतके
दाटले का तुझे काळीज
का न थामू शकले
तुझे हात आई ?
तुटक्या हृदया सांग
कसे सांधायचे आई ?
वेदना लपवली जरी
दिसतेच ती कशी सावरू
तूच सांग ,तूच सांग आई
हृदयात तू जिथे तिथे तूच आई
सावरून किती स्तब्ध होऊ अजूनी
आभाळ दाटले उरात जरी
न बरसणार तुझ्यासाठी तरी
थकले होते आधीच मीही तरी
का ? पुन्हा पुन्हा उरले
तेच तेच जिवन जगण्यासाठी
तू तर सोडलेच माझे हात
सांग का ? अन् कुणासाठी ?
तुझे दुःख न सांधू शकले मी
जणू त्याचीच ही शिक्षा
जन्मठेप म्हणून भोगतेय मी.......

-Meenakshi Mali

Manish Thakare

Kavita khupach Chan ahe asech kahitari aushyabhar lihit raha