प्रेरणा

Started by meenakshi mali, April 20, 2016, 02:00:27 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

जगायचं तर असं जगावं
संकटानंही विचारात पडावं
किती पिडावं आता बास
जगावं तर असं
दिलखुलास होऊन
शत्रुनंही पुढ्यात येऊन नमावं
जगावं तर असं
हार नको जीतही नको
द्वेष नको इर्षा नको
पवित्र विचार नी पवित्र
माणसं असतील सोबतीला
फक्त आता ध्येय गाठावं
झालं गेलं विसरूनी
पुढे चालत रहावं
जगावं तर असं जगावं......

-Meenakshi





ABHISHEK Mali

मी सुशिक्षित आडाणी
तुमचं ते स्मार्ट
फोन बिन मला कळत नाही
चार भिंतीतल जग माझं
कसलं काय ते
नवं तंत्रज्ञान बिन
मला खरंच समजत नाही
हसताल तुम्ही पण
तोडकं मोडकं
वाचते नी लिहीते
तुमचं ते इंग्लिश बिंग्लिश मला
उलगड नाही
कोंडलेल्या श्वासात
जेवढं साठलय
तेवढं लिहीते
मी कुणी मोठी
कवयित्री नाही
तुमचं हे आधुनिक जग
मला फारसं रुचत नाही
भावनांच गुंतणं इथं नाही
नात्यांची ओढही इथ नाही
मँगीसारखं इथं सगळं
इंस्टंट लागतं
मरणाचा स्टंट जिवनात असतो
मला कसल्या भानगडीत
पडायचंच नाही
चालू दे चालतय
आलं मनात म्हणून
मी लिहीतेय....

Meena
9503878003

subodhsawant

 :) छाण आहे कविता ...