स्वामी नाम

Started by शिवाजी सांगळे, April 20, 2016, 08:46:44 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वामी नाम

तुजसा कृपाळु, दुजा नाही दाता
तुच सकलांसी, उद्धारीता !

राहोनी पाठीशी, करी दूर चिंता
हरविसी दुःखा, तुच त्राता !

भक्ती तुझी साधी, नसे स्तोम मात्र
अस्तित्व ते सुक्ष्म, वसे सर्वत्र !

त्वा कृपेस पात्र, राहो सदा आम्ही
वदू नित्य मुखी, नाम स्वामी !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९