अर्धांगीणी

Started by nitin bahakar, April 21, 2016, 12:24:03 AM

Previous topic - Next topic

nitin bahakar

😄😄अर्धांगीणी😀😀

तुमच्या आई वडिलांची
किटकिट नेहमीची
बिदाई करा लवकर
आता तुमच्या बहिणीची

तुमच्या आई वडिलांना
वृद्धाश्रमात न्या
माझ्या मम्मी पप्पांना
आपल्या घरी घेऊन या

आपल्याला तुमच्या भावाची
सांगा गरज तरी काय
सुख दुःखामधी आपल्या
येईल माझा बंधुराय

मी रागावली तरी
तुम्ही नेहमी हसा
स्वयंपाक मी करेल
भांडे तुम्ही घासा

आपल्या संसार गाडीची
मी मालकीन तुम्ही मालक
बंधु माझा कंडक्टर
माझे मम्मी पप्पा चालक

मग नांदू सौख्यभरे
तुम्ही राजा मी राणी
मग बघा कशी होते
कोमल माझी वाणी

माझेच शब्द असू द्या
नेहमी तुमच्या ध्यानी
कारण
तुम्ही माझे पतीराज
मी तुमची अर्धांगीणी

✒नितीन बहाकर
दि.19/01/2016
मो📲9766006195