==* माझ्या अंगणातं *==

Started by SHASHIKANT SHANDILE, April 21, 2016, 12:56:22 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

भावनेची लाश पडली माझ्या अंगणातं . . २ . .
का कुणी येउनी केले घाव या मनातं
भावनेची लाश पडली माझ्या अंगणातं . . २ . .

मी नाही कुणाचा वैरी वैर ना कुनाचे
नाते जपले याचे त्याचे प्रेम भावनेचे
का कुणी हा घात केला नाजुक मनाशी . . २ . .
भले केले जेही झाले जन मानसाचे

भावनेची लाश पडली  . . . . . . . . . . .

जिथे तिथे मुर्दे पडले तुटक्या स्वप्नांचे
किती करू राखन मी जोडल्या नात्यांचे
चुकलो कुठे मी अनं गैरसमझ झाले ते  . . २ . .
विखरले स्वप्न सारे आंधळ्या डोळ्यांचे

भावनेची लाश पडली  . . . . . . . . . . .

आज का पेटून उठले मन माझे हे असे
आपल्याच लोकांनी तोडले हो भरवसे
प्रेमानेही भेट दिला एकटेपणा हा असा . . २ . .
मीच मारून भावनेला मन केले मोकळे

भावनेची लाश पडली माझ्या अंगणातं . . २ . .
का कुणी येउनी केले घाव या मनातं
भावनेची लाश पडली माझ्या अंगणातं . . २ . .
---------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!