करू नका आत्महत्त्या

Started by meenakshi mali, April 22, 2016, 10:42:23 AM

Previous topic - Next topic

meenakshi mali

करू नका आत्महत्त्या कुणी
हाल मी त्याचे भोगले आहेत
माझ्याच जीवाभावाचे मी डोळयासमोर तडफडताना पाहीले आहे
करू न शकले काही मीही
कारण विषाचे प्यालेच
आम्ही सा-यांनी प्याले आहेत
त्यातून मी बचावले आहे
करू नका कुणी आत्महत्त्या
मागे रहाणा-यांचे हाल
माझ्यासारखे होत आहे
गेलात तुम्ही तर मिळेल काय?
पाच पंचवीस हजार
पण यापेक्षा तुमचाच
जीव लाखमोलाचा आहे
करू नका आत्महत्त्या
तुमचीच लेकरं पोरकी होणार
मग सांगा कुणाच्या तोंडाकडं
ती पहाणार ?
त्याचे भोग मी भोगले आहे
आजही आईविना माझे श्वास इथं
गुद् मरत आहे
वनवास मी भोगला आहे
कर्जापायी घरातले गमावले आहे
विषाचे प्याले मी घेतले आहे
कोण कोणाचे नसते अनुभवले आहे
करू नका कुणी आत्महत्त्या
हार मानून कुठे कुणाचे भले झाले आहे ?
पुसून कुंकू कपाळाचे तुम्हाला काय मिळणार आहे?
जिद्द ठेवा जगण्याची
संकटांना सामोरे जाण्याची
कर्ज फिटेलच की कधीतरी
पण गेलात तर
मागे रहाणा-यांनी माझ्यासारख्यांनी
आई बाप आणायचे कुठून ?
सांगा आम्ही लेकरांनी जायचे कुठे ?
असेत गुद् मरतात श्वास कितीतरी
करू नका आत्महत्त्या कधी कुणी........
आत्महत्त्या कुणी .....
ढळतात अश्रु माझे आई साठी अजूनही...
सांगा परत आईला आणु शकेल का कुणी ... ...

-Meenakshi

Ravi Padekar