अस्तित्व

Started by meenakshi mali, April 22, 2016, 07:04:30 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

नावातच माझ्या
मी नकोशी
सहवास माझा
कुणा नको
जन्मतःच मी
दवाखान्याकडे येणारी
बापाची पावलं
माघारी फिरली
मुलगी म्हणून
गुन्हा काय माझा ?
वयात येताच
किळसवाण्या  नजरा
माझ्याच सभोवताली
मोकळा श्वास घ्यायला
फुरसतही नाही मिळाली
आईही साथ सोडून गेली
तोवर सौभाग्य आलं
नातं नावापुरतंच उरलं
नावातच माझ्या मी नकोशी
पिलूही तोवर पदरात पडलं
पिलापुरतं जगणं माझं उरलं
तोवर काळानं घात केला
मायेनं विणलेलं घरटं पुन्हा तुटलं
नकोच असलेली माझीच
सावलीही उन्मळून पडली
गुन्हा मी काय केला ?
मुलगी म्हणून
बहीण म्हणून
पत्नी म्हणून
आई म्हणून
नकोयत आता कुणा
माझ्या अस्तित्वाच्या खुणा
मुलगी म्हणून
सांगा खरच
गुन्हाय का माझा ?
की जगणं हाच  गुन्हाय  माझा ?

-Meenakshi