आई मला जगायचंय गं

Started by meenakshi mali, April 23, 2016, 12:19:40 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

आई तुझ्या उदरात मी
मला जगायचंय गं
तुझ्या अंगणी मला
बागडायचंय गं
तू तलवार हो मी
तुझ्या तलवारीची
धार होईन गं
जिवनाचा तुझ्या हा लढा
मी तुझी ढाल बनेन गं
आई मला जगायचंय गं
तुझ्या कुशीत निजायचंय गं
भातुकलीचा खेळ खेळायचा गं
कुशीतली ऊब तुझ्या
मला पांघरायचीय गं
चिमुकल्या हातांनी तुला
मला घास भरवायचाय गं
तुझं हरवलेलं अस्तित्व
मी परत मिळवून देईन गं
तुझ्या आसवांना पुसेन गं
तुझे नाव मी काढीन
व्यर्थ चिंता तू करु नकोस गं
मी येतेय आता
ऊदरातुनी तुझ्या
वाट माझी  कुणाला
अडवू देऊ नकोस गं
आई मला जगायचंय ग
तुझ्या कुशीत फुलायचं गं.......

-Meenakshi