टिचभर पोटासाठी तू

Started by meenakshi mali, April 23, 2016, 04:39:43 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

पूर्वीसारखं आता काही नाही राहीलं
ऊन पाऊस वारा यांच्याशीही नातं तुटलं
पूर्वी तू यायचीस धावत पळत
कधी तळपत्या उन्हातून तर
कधी मुसळधार पावसातून
मी वाट पहात बसायची खिडकीतून
तुझ्यासाठी चहा तयार ठेऊन
टिचभर पोटासाठी तू पळत रहायचीस
अन् आतल्या आत कुढत रहायचीस
पूर्वीसारखं काहीत नाही राहीलं
नातीही कुठल्या कुठं
कापडासारखीच विरत गेली
काळजाला आता ठिगळं लागली
मोठीला मोठी म्हणून न् बारक्याला बारकं
म्हणून तू सोडून दयायचीस
मला मात्र चोपुन काढायचीस
निदान तेवढयानं तरी तुझा
मला स्पर्श व्हायचा
जो मला हवाहवासा वाटायचा
शेवगा पाहीलं की आपसुकच
डोळ्यासमोर तू येती
डोळयात आभाळ दाटतं
तू चिडायचीस माझ्यावर
मी जेवत नाही म्हणून
रूसून मी जेवण बंद करायची
आजही माझी सवय तशीच राहीली
तू मात्र केव्हाच निघून गेली
आठवणींचा डोंगर माझा
ऊशाशी ठेऊन गेली
अन् जाता जाता
तुझ्या दुःखाची सावलीच मला करून गेली....

-Meenakshi