संघर्ष

Started by meenakshi mali, April 24, 2016, 09:26:42 AM

Previous topic - Next topic

meenakshi mali

संघर्ष अजूनही करते मी
कितीही संकटं आली
तरी लढतेय
चूकून एकदा मुलाला
बोलून गेले
कर्ज बाळा झालेय रे
कुणीच नाही आपले उरले रे
मरायचं का आपण ?
एवढसं पिलू पटकन
म्हणालं मला अजुन जग पहायचंय
खुप शिकायचंय मोठ व्हायचंय
क्षणात भानावर आले
नी पिलाला कवटाळले
अजूनही संघर्ष करतेय
लढा हा जिंकायचाय
पिलासाठी आता मला जगायचंय
ग्रीष्माच्या तप्त लोहात भाजतेय
रोज नवं संकट पुढ्यात ठाकतंय
तरी मन आता कुठं हार मानतंय
चिमुरडयाला माझ्या जग दाखवायचंय
त्याच्यासाठी मला जगायचंय
येऊ दया किती वादळं आता
त्यांनाच माघारी परतवायचंय
अजूनही संघर्ष करतेय
रात्र नी रात्र जागीच रहातेय
काळजीनं पोराच्या हृदय फाटलेय
ठिगळ लावायलाही काही नाही उरलेय
पैसा महत्त्वाचा किती कुणाला हे उमगलेय
आपुलकीचे झरे आता आटू लागलेय
संघर्ष जीवनात अजूनही करतेय
बालपणापासूनचे आत्ता पर्यंतचे
दिवस त्यातच गेले
काही होवो तिकडे आता जगणे नाही सोडायचे
आत्महत्तेच्या वाटेकडं मला
पुन्हा नाही परतायचेय ....
पिलासाठी माझ्या मला जगायचेय
उत्तुंग आकाशाला शिवायचंय......

-Meenakshi