दोन लेकरांची आई मी

Started by meenakshi mali, April 24, 2016, 11:40:41 AM

Previous topic - Next topic

meenakshi mali

भयाण एक रात होती
आयुष्य संपवायची
चार जणात बात होती
गेले दोन जीव त्या राती
बहीण न् भाऊ उरले
कसबसे जगू लागले
एक लेकरू आईचं
दुसरं लेकरू माझ्या उदरातलं
दोन लेकरांची आई
होऊन मी जगू लागले
मायेचं पांघरूण दोघांना
सारखेच घातले
आईच्या लेकराला
पंख फुटले नी
त्याने त्याचे घरटे बांधले
दोन लेकरांची आई मी
माझ्या चारित्र्यावर
शिंतोडे उडवले
बहीण भावाच्या
आई मुलाच्या नात्याला
हो कलंक तीने लावीले
गुंता नको नांत्यांचा व्हायला
अधिक म्हणून मी
घरटे त्याचे माझे सोडले
आता त्याचे मी माझे
वेगवेगळे झाले
नातं ही विरत गेले
लेकरू आईचं मला विसरू लागले
यशोदा होऊन मी काय मिळवले ?
तोवर काळान दुसरा घात केला
माझे लेकरू अंधत्वाची
पायरी चढू लागले
आतडं माझं तुटत गेलं
काळीज चिरत चालले
ख-या आयुष्याची गाथा माझ्या
मीच आता पुढे न्यायची
किती वादळं आली
तरी जगत मी राहीले
लेकरांची आई होऊन
जगत राहीले
जगतच राहीले.......

-Meenakshi