उलुशा आयुष्यात

Started by meenakshi mali, April 24, 2016, 02:08:04 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

ऊलुशा आयुष्यात सारंच
हवंहवंसं वाटतं
हिशोब करता आयुष्याचा
आयुष्य शुन्यातच उरतं
का कोणास ठाऊक ?
तरीही त्यामागेच मन धावतं
चुकांनी आयुष्य
भरलं जरी
पाऊलं माघारी घेत नाहीत
चुका करून जगण्यापेक्षा
चुका सुधारणं
सुधारण्यासाठी जगणं
जगण्यासाठी गेलेला
विश्वास परत मिळवणं
गरजेचं असतं
हव्व्यासासाठी कधी
जगायचं नसतं
उलुशा आयुष्यात
आनंदी होऊन
जगायचं असतं
आहे त्यात समाधान
मानून पुढे चालायचं असतं ......

-Meenakshi