भाऊ

Started by meenakshi mali, April 24, 2016, 03:13:42 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

आक्रोशत होते
काळीज तिचे
भावासाठी विव्हळत होते
आबा आबा करीत
चित्कारत होते
किती गरीब असो वा
श्रीमंत कुणी
बहीण भावाचे नाते
हे अतुट असते
ताई ही दुसरी
आईच असते
भाऊ स्तंभही
असतो घराचा
पायाही असतो
जेव्हा तो निघून जातो
दुःखाचे आभाळ बरसते
क्षण न् क्षण परका होतो
जेव्हा तो जवळ नसतो
मुलासारखा असतो
त्याचा विरह बहींणींना
सहावत नसतो
भाऊचा दरारा असला
जरी मायेचा पाझर
त्यालाही फुटत असतो
भाऊ भाऊच असतो
बहीणीचा न् कुटुंबाचा
तो आधार असतो
तिचं विव्हळणं थांबतच नव्हतं
मुखातून तिचा असं बरच
बाहेर पडत होतं
हृदय तिचं फाटलं होतं
आबा आबा करत होतं
का गेलास  म्हणत ती
रडत होती
भावासाठी तिचा मुखातून
कविता निघत होती
खचलेली खंगलेली
बहीण वेदना लपवूच शकत नव्हती
आबा आबा करत
रडत होती
आबा असा रे
कसा गेलास म्हणून
आक्रोशत होती......

Meenakshi