तुझं हे अचानक येणं....

Started by meenakshi mali, April 24, 2016, 04:11:30 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

तुझं हे अचानक येणं
मला मोहून टाकतं
वेदनांनी दाटलेलं मन
ओसंडून वहायला लागतं
बरसणा-या धारांचं
अन् अश्रुंच मिलन होतं
कोणाला कुठ कळतं ?
श्वास गुद् मरला की
वहातो इथे मनाचा झरा
दिसतात पावसाच्या धारा
हिच जगण्याची रित
माझ्या न् तुझ्या मनाची प्रीत
पहायला रे कुणाचे काय जातं ?
तुझ नी माझं एक होणं
कोणाला कुठे दिसतं ?
तुझं हे अचानक येणं
खरंच झक्कासच असतं
आभाळ दाटलं की
इकडे मन फाटायला लागतं
तुझ्या येण्याची चाहूल होऊन
मन तुला भेटायला तडफडतं
आक्रंदून उठलेलं मन
तुझ्यासोबतच वहायला लागतं
कुठं रे कुणाला कळतं ?
Meenakshi