एकांत

Started by गणेश म. तायडे, April 24, 2016, 08:06:08 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

ये, बस बाजूला!
हातात हात दे
खांद्यावर डोक ठेव
शांत बस अन्
बोल हळूच थोडे
लाजून थोडं हसून
सारे जग विसरून
डोळ्यात पहा माझ्या
कर प्रेमाचा वर्षाव
झुकतील तुझ्या नजरा
पाहून खोडसाळ स्वभाव
तासंतास बसावं
एकमेकांत रमावं
माझ्या डोळ्यात तु
तुझ्या डोळ्यात मी
एकमेकांना पहावं
हृदयातील स्पंदनांना
एकांतात ऐकावं
आयुष्य असचं असावं
फक्त तुझ्या सोबत जगावं

- गणेश म. तायडे,
   खामगांव