स्वातंत्र्य

Started by meenakshi mali, April 25, 2016, 09:36:57 AM

Previous topic - Next topic

meenakshi mali

स्वातंत्र्याची व्याख्या
मला कळत नाही
खरंच स्वातंत्र्य
मिळालंं भाारताला ?
भ्रष्टाचाराच्या दलदलीत
खोलवर रूतलाय भारत देश
भरदिवसा कुठेही
रस्त्यावर खुन होतात
लहान चिमुरडीही
इथं विकली जातात
नाहीतर
हात पाय तोडून
भिकेला लावली जातात
तान्ह बाळ इथ
खुलं सोडता येत नाही
सांगा खरंच
स्वातंंत्र्य मिळालंय का ?
सहा महिन्यापासून वय सत्तर
असलंतरी रस्त्यावर गल्लीत
भरदिवसा कुठेही कधीही
महिलेवर अत्याचार होतोय
भिती वाटते आता
फिरण्याची मजा नाही
अशा स्वातंत्र्याची
बेरोजगारी वाढत चाललीय
नोकरी नाही म्हणून
पोरं माझी भरकटत चाललीय
दोष तरूणाईला का देताय ?
तुमचेही कुठे चुकत नाही का ?
तरूण बेरोजगारच फिरतात
तरूण  माझ्या सा-या भावांना
दादोजी कोंडदेवांसारखे गुरू
कुणी गुरू मिळतील का ?
खरंच स्वातंत्र्य मिळालय का?
फ्लेक्स पाहीला परवा एक
अंगठे बहाद्दरही आहेत
ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच आहे
नी आम्ही पदवीधर
असूनही कुणीच नाही
टवाळकी म्हणून फिरतोय
एका भावाच्या
डोक्यात सत्तावीस वार झाले का?
पुढे जातं कुणी तरूण
तर तेही कुणाला बघवत नाही
सांगा खरच देश स्वातंत्र झालाय का ?
पैशाच्या पावसापायी
करणीच्या नावाखाली
इथं मरणाचे बळी
दिले जातात
माझ्या चिमुरडयांच्या पाठीवर
किती ओझी
आई बाबांच्या
अपेक्षांची ओझी
शाळेच्या दप्तरांची ओझी
हि लेकरं खेळ म्हणजे काय?
उदया विचारतील तेव्हा
उत्तर काय?
मोबाईल कॉम्पुटर हेच झालं खेळणं
नाही जमायच बालपणाच जगणं
ऐन सुट्टीत झाडाचे आंबे तोडणं
पाहुणा आला की तोही पहील
विचारतो वॉट इज युवर नेम ?
कोणत्या क्लासमधे ?
कुणी विचारेल का
बाळा तुला रे काय आवडतं.....
सांगा खरंच स्वातंत्र्य
आपल्याला मिळालंय का  ?......


खुप दिवसापासून लिहायच होतं
अजूनही खुप बोलायचं होतं
मनात भितीनं ऊर दाटत होतं
म्हणेन आता बाबारे मारायचं
असेल माझ्या मुलासहीत मारुन टाक
पर्वा मला आता नाही
पण लेकराला माझा शिवाय मात्र कुणी नाही
हो पण मारायच्या आधी एकदा मला सांगून टाक...
Meenakshi