दुष्काळातली कोंडी

Started by Dnyaneshwar Musale, April 26, 2016, 02:24:22 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

बाप माझा शेतकरी
दुष्काळ नांदतोय  घरी
भकासच रान झालय मोकळं आभाळ
भुकेसाठी काय खाणार ढेकळं
माय बाप असे गाई गुरं
आडवं पडावं का त्यांचे मोरं
नग राजा सर्जा तु रडु
थोडं दिस गावभर हिंडत काडु
शोधता शोधना पान झाडाची
कुजत चालली पारुंभी वडाची
घरी येता बा जोर जोरात हसतो
तोंड झाकुन गुरात एकलाच बसतो
माय देती आवाज जोरात
त्याल नाही या घरात
बा त्याल आणाया आज  गावाशी गेला
म्या वाट बगतुया बाबा अजुन  घराशीच नाय आला.