असशील कुठे तर..

Started by meenakshi mali, April 27, 2016, 12:59:49 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

असशील कुठे तर ये ना गं आई
दाटलाय कंठ आभाळ भरलंय उरात
पण मोकळंच होता येत नाही
चिंध्या झाल्या आयुष्याच्या
पण ठिगळ लावता येत नाही
असशील कुठे तर ये ना गं आई
दलदलीतून मला बाहेर काढ
हात दे मला तुझ्यापर्यंत यायला
जगण्याची ओढ मला नाही
माझ्या पिलाव्यतिरिक्त गं
मला कुणी उरलं नाही
असशील कुठे तर ये ना गं आई
असती तू तर आज
चारित्र्याला कुणी माझ्या
कलंक लावला नसता
एका घरटयाची दोन घरटी झाली नसती
तुझी लेकरं वाट चुकली नसती
रक्ताची गं नाळही तुटली नसती
मायेची छाया हरवली नसती
असशील कुठे तर ये ना गं आई
बोलायला गं माझ्या जवळ कुणी नाही
वाहतात अश्रुंचे झरे आता थांबतच नाही ......
थांबतच नाही ...ये ना गं आई....
Meenakshi

ketan(k.k)