नातं...

Started by meenakshi mali, April 27, 2016, 01:15:41 PM

Previous topic - Next topic

meenakshi mali

नातं तुटलं की पुन्हा
पहील्यासारख सांधता येत नाही
मनावर झालेले घाव
ओसरले जरी
व्रण मात्र जात नाही
दुःख देणारे असले जरी
सुख देणारे सापडल्या शिवाय रहात नाही
जगण्याचं गणित असतातच निराळी
ती सोडवल्याशिवाय रहवत नाही
दिवस सरतात बालपण हरवतं
नातीही  विरत जातात
वेळ निघून जाते
तेव्हा मात्र डोळयात पाणी
आल्याशिवाय रहात नाही
अन् डोळयातल्या थेंबांचा
आवाजदेखील होत नाही.......
Meenakshi

माझ्या
कवितांना प्रतिसाद दिल्याबद्दल
सर्वांचे मनापासुन धन्यवाद