आताच शब्द फुलांची...

Started by श्री. प्रकाश साळवी, April 27, 2016, 07:03:22 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

आताच शब्द फुलांची...
आताच शब्द फुलांची ओंजळ बहरून गेली
आताच शब्द माझे "कविता" प्रसवून गेली
गाईले "प्रिती"ने शब्दांचे सार्थ ते पवाडे
मनाच्या प्रित भावनांची वीण ती ऊसवून गेली
मला न जपता आले भान ते शब्द फुलांचे
गेले न शब्द सारे कविताच झुलवून गेली
निवडून शब्द सारे गुंफला गोफ त्यांचा
भावना मनाच्या शब्द हे ऊमजून गेली

✍प्रकाश साळवी ❤❤