हांबरडा स्वप्नांचा

Started by amishkamble, April 28, 2016, 01:36:02 PM

Previous topic - Next topic

amishkamble

हांबरडा स्वप्नांचा



मला अशी गोष्ट बनव ,
       जशी जगात कुठेच नाही ,
कितीही पैसे दिले तरी ,
       मला विकत घेणे शक्य नाही ....

माझा सहवास आनंद देई ,
     मला सर्व शरण येई ,
माझी सर्वस औद्द लागे ,
      माझा साठी अश्रू डोळी दाटे...

नाही बनायचं ,
      कुटल्या देवाची मूर्ती ,
नाहीच कुटल्या
      सिलेब्रीत्यची कुत्री ...

बनायचं मला ते ,
      दुष्काळाचे ढग ...
पाहवत नाही ,
      त्या शेतकऱ्यांची धग....

तू काही करत नाहीस,
      मला तरी करू दे ...
अश्रू माझे दाटलेले,
      त्यांचा कमी तरी येऊ दे ...

नको तुझा पगार मला ,
      करेल बिन पगारी चाकरी ..
त्यांचा साठी बेफान बरसेल ,
      जाऊदे मुखी दोन वेळेस भाकरी...

बनून वेडा पाउस मी,
      समस्त जग मी खुलवेल ...
निसर्गाला कुशीत घेऊन ,
      त्याला प्रेमानी कुरवाळेलं...

हा आयुष्य मला ,
       अभिमानाने जगायचं ,
कोणाचा ताटा खालचं,
      मांजर नाही वायचं ...

आता बळीराजा सुखावला ...
      दुष्काळ दुखावला ...
म्हणून सांगतो देवा मला अशी,
      गोष्ट बनव जशी जगात कुठेच नाही...

-अmish