ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 28, 2016, 02:13:44 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

अजुन एक वीर गेला
जग कायमचा सोडून
आम्ही ही मोकळे होऊ
सर्व श्रध्दांजली वाहून!!

मेनबंत्ता पेटवू आम्ही
मिनिटभर स्थंभ उभे राहू
सोशल मिडीयावर आम्ही
नावासह श्रध्दांजली वाहू!!

अरे कँमेऱ्यापुढे येऊन
भावूक भाषन आम्ही देऊ
जनमनात पोहचण्यासाठी
रडून श्रध्दांजली वाहू!!

टिःव्ही पेपरात ठळक
नाव चमकेल कस पाहू
असे आम्ही सोंग करुन
तुला श्रध्दांजली वाहू!!

आज तु उद्या दुसरा असेल
पण तु काळजी नको करू
त्यालाही भावूक होऊन
आम्ही श्रध्दांजली वाहू!!

तुम्ही रक्षणकरा सीमेच
आम्ही देश पोखरून काढतो
लुटमार करून आम्ही
देशात सीमा पाडतो!!

तुम्ही सीमेवर जागसूत असा
आम्ही करू स्वार्थाची चाकरी
देशात जातीवाद भ्रष्टाचार
करून देश करतो भिकारी!!

तुम्ही शत्रूशी झुंजत रहा
शेवट पर्यत लढत रहा
आम्ही जनतेत गट पाडून
सत्ता कशी भोगतो पाहत रहा!!

तुम्ही शत्रू रोखून धरता
आम्ही देशातच निर्माण करतो
मारामाऱ्या दंगली घडवून
देशात अशांतता माजवतो!!

तुम्ही लढता आमच्यासाठी
आम्ही देशातच लढवत राहतो
तुझ्यासारखा वीर गेल्यावार
आम्ही श्रध्दांजली वाहतो!!

( भारत मातेचे वीर शहिद जवानांचा वापर करून प्रसिद्ध मिळवणारे प्रसिद्ध पिसाट स्वार्थाचे राजकारन करणाऱ्या पुढाऱ्यांवर नकळत तळतळाट व्यक्त झाला तसेच माझ्यासारख्या सामान्य माणसाला शहिद जवान कडून काही शिकता येत नाही तो वीर देशासाठी आपला जीव देतो आणि आपल्याला देशासाठी द्यायला पाच मिनिटे ही नाहीत किती स्वार्थी आहोत आपण)
कवि ललित कुमार
wapp-7744881103
---------------------------------