ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 28, 2016, 02:18:23 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

डोळ्यात अश्रू आले बघूनी त्या बाळाला
मंदिराकाठी बसला होता तो मागायला।।

प्रत्येक चेहरा पाहे तो मोठ्या आशेने
मागाया चिमुकले हात त्याने पसरवले।।

देवदर्शनाची गर्दी होती येणाऱ्या भक्ताला
याला कायम अपेक्षा दोन घास पोटाला।।

देवदर्शनास जात होते भक्त त्या गर्दीतुन
हा त्याच्याकडे पाह्ये भरल्या डोळ्यांतुन।।

हा मागत होता पोटासाठी हात पसरुन
देवाच्या भक्ताने दिला तो हात झटकून।।

भक्त सांगे खिशात माझ्या सुटे नाही
जाऊन टाके देव तिजोरीत नोटा काही।।

भक्त देवा पुढे नैवेद्य देई तुप भात
याच्या पोटात लागली होती भूकआग।।

अश्रू घेऊन डोळ्यात तो मागत होता
भक्त निर्जीव दगडात देव शोधत होता।।

ललित कुमार
wapp-7744881103
************************