ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 28, 2016, 02:22:03 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

असे कुठले क्षेत्र ! नाही माझ्या देशात
तिथे कोणी सांगेल ! नाही भ्रष्टाचार !!

मी बळी पुत्र ! पाहतो माझ्या डोळाने
शेतातला बांध काढणे ! आहे भ्रष्टाचार !!

गाईगूर पाळने ! दुधव्यवसाय करणे पण,
दुधात पाणी टाकणे ! झाला भ्रष्टाचार !!

शेतमजूर निघतो ! प्रश्न पोटाचा घेऊन
दाम देण्यात काचकूच ! हाही भ्रष्टाचार !!

जगायला पैसा ! पैसाकरीता काम
केला कामचुकारपणा ! तो ही भ्रष्टाचार !!

पुरीसी संपत्ती ! तरी निराधार सांगने
दारिद्रयरेषेत जगने ! होतो भ्रष्टाचार !!

योजना हे हक्क ! गरजूनीच घेने
हक्काची चोरी ! म्हणजे भ्रष्टाचार !!

मतदान हक्क ! लोकशाहीची ताकत
हक्काची विक्री ! एक भ्रष्टाचार !!

आपल्यातील चूका ! आपणच दाबतो
वरच्याचा स्वार्थात ! असणार भ्रष्टाचार !!

ललित कुमार
wapp-7744881103
**************************