ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 28, 2016, 02:26:00 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

आता एकदा परत आमच गाव
ऐकमेकांच्या विरोधात दिसेल,
आल्या ग्रामपंचायत निवडणूका
भाऊभाऊ वैरी म्हणून फिरेल!!

निवड एकच जागेची असेल
तिथे चारचार उमेदवार दिसेल
विरोधात सख्खा भाऊ नाहीतर
आपला जवळचा नातलग असेल!!

तो याच्या विरोधात प्रचार करेल
हा त्याच्या विरोधात प्रचार करेल
हार जीतचा निकाल लागल्यावर
भाऊभाऊ रक्त काढायला भिडेल!!

दुश्मनी इतकी खोल असेल की
एकमेकांचे तोंड पाहणार नाहीत
निवडणूक राजकारणात जाऊन
आईबापास ते भेटू देणार नाहीत!!

किरकोळ निवडणूकिचे परिणाम
पुढची पिढी वैरी म्हणून जगेल
असाच चालत राहिला भारत मग
सांगा एकजूट भारतदेश कधी घडेल??...

ललित कुमार
wapp-7744881103
***************
***************