ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 28, 2016, 03:30:06 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

बाप माझ्या शेतकरी
ढेकळात एकरूप झाला
माय माझी बापाच्या
दुःखात एकरूप झाली!!

बाप माझा आवतामाग
उनातानात बैल हाकलतो
माय काडीभाटा वेचून
संसाराच गाड हाकलते!!

बाप माझा मळ्यात
राबून सोन पिकवतो
माय माझी घरामधी
चूल्यावर भाकर शेकते!!

बाप माझा कष्टकरून
अपेक्षा करतो सुखाची
माय माझी आहे आधार
माझ्या कष्टकरी बापाची!!

देवरूपी मायबाप माझे
जीवभर कष्ट करत आले
फक्त सुखाच्या अपेक्षेपाही
जीवनभर दुःख सोसत आले!!

दारिद्रय आमच्या घराच्या
उबंठ्यात पक्क गाडलय
मायबाप दिनरात राबून भी
आमचे जीवन ना सुधारल!!

ललित कुमार
wapp-7744881103
----------------------------------