ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 28, 2016, 03:33:25 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

ज्या नाही जमीन झूमला
ज्या नाही नोकरी चाकरी
तो माणूस कसा जगतो
कोणी सांगू शकेल का??

पाठीवर संसार घेऊन
गावगाव भटकनारा
प्रश्न पोटापाण्याचा
कष्ट करून सोडवणारा।।

रस्त्याकाठी संसार मांडून
तीन दगडांची चूल स्थापून
कच्चीपक्की भाकर शेकून
पोटाची आग विझवणारा।।

आसमानच पांघरूण करून
काळी मायच अंथरूण करुन
हिवाळा ऊनाळा पावसाळा
निसर्गालाच घर मानणारा।।

जगण्याचा कुठला मार्ग नाही
भविष्याचा कुठला विचार नाही
स्वप्न नाही स्वार्थ नाही
अपेक्षा फक्त पोटाला भाकरीची ।।

असा हा भटका समाज
भिल्ल, गारूडी, डमरूवाले
पासपारधी , नंदीबैलवाले
कसा जगतो कोणाला दिसतो का?

ललित कुमार