लाडावल्या आसवांना....

Started by श्री. प्रकाश साळवी, April 28, 2016, 06:09:51 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

लाडावल्या आसवांना...!

लाडावल्या आसवांना गालावर ओघळून दे
नभ आले भरोनी त्यांना मोकळे बरसून दे
हा निसर्ग केतकीच्या बनी गात आहे मारवा
आसवांनी ती सजलेली भैरवी पुन्हा गाऊन दे
तु असे आसवांचे लाड भलते ग पुरवू नको
मोडके आयुष्य माझे या गालांवर चितारून दे
घे रीते घडे भरूनी आसवांच्या ओंजळीने
दे दे मोती आसवांचे दे असे ऊधळून दे
किती आहेत दीवाणे असे तुझ्या आसवांचे
एकेक आसवांच्या दवात चिंब ओले भिजवून दे

प्रकाश साळवी